Monday, 23 January 2017

ठोसे घर धबधबा

दोनच दिवसांपूर्वी ठोसेघर धबधबा पाहून आलो.अनेक वेळा सातारा या गांवात जाणे होते पण काम झाले की परत.पण दोन दिवसांपूर्वी सातार्यात गेलो होतो काम झाले निघण्याची घाई न्हवती.मित्राला म्हटले मी इतक्या वेळा इथे आलो पण ठोसे घर चा धबधबा नाही पाहिला.त्याने लगेचच मोटर सायकल काढली आणि निघालो.निसर्गरम्य परिसरातून जातांना वाटेत अजिंक्य तारा दिसतो हा गडही खुणावत असतो.पुढे सज्जन गड लागतो त्याच्याच अलीकडच्या माचीवर एक कॉलेज आणि समर्थ srushti दिसते.पुढे 10कि मी वर ठोसेघर धबधबा आहे.इथे लहान आणि मोठा असे दोन धबधबे आहेत.यापूर्वी मी शिलोँग येथील चेरापुंजिचा धबधबा पाहिला आहे पण त्या पेक्षाही हा धबधबा भारी आहे मुद्दाम जुलै ऑगस्ट मधे जा खूपच आनंद मिळेल.बसने गेलात तर दोन अडीच कि मी चालावे लागेल तो हि चालत चालत जाण्याचा पावसाल्यातील आनंद वेगळाच असेल.येताना समर्थ srushti आणि सज्जन गड पण पहा.समर्थ srushtila तिकिट आहे 40रु आणि ठोसेघर येथे 10रु.अच्छा तर नक्की जावा जुलै ऑगस्ट मधे.🙏