Tuesday, 1 March 2016

काहीतरी

मी शरद छत्र्ये मूळचा सांगलीचा आहे.सद्ध्या मी नेदरलँड्स इथे आलो आहे.माझा मुक्काम जवळ पास 15एप्रिल पर्यंत आहे.तोपर्यंत मी इथे काय काय पहातोय ते मी ब्लॉग वर टाकणार आहे.कांही लिखाण लिहून झाले आहे.तेही मी या ब्लॉग वर टाकीन ते तुम्ही वाचून मला तुमच्या प्रतिक्रिया आवश्य कळवा.

16 comments:

  1. नेदरलँड्सला हवामान नेहमीच लहरी असते काल पासून पाऊस आहे.आपल्याकडे जसा मोठा पाऊस पावसाळ्यात पडतो तसा मोठा नाही पण चिरचिर.इथं स्नोफाल होतो पण रस्ते चालु असतात.हळु हळु टुलिपच्या फुलांचा सिझन सुरु होईल.रस्त्याच्या कडेला टुलिपची फुले यायला लागली की एकदम छान वाटेल.अर्थात तसे इतर वेळी सुद्धा फिरायला मजा येते फक्त पावसात नको वाटते.मी रोज काहीतरी लिहीन असे म्हणालो आहे म्हणून हा प्रयत्न.whats app ग्रुप्वर लिहिले आहे ते ब्लॉग वर पेस्ट कसे करता येईल याचा प्रयत्न चालु आहे पण ते जमेल तेंव्हा जमेल ब्लॉगवर रोज लिहीन.नेदरलँड्स हा देश युरोप मधील देश.लोकसंख्या अवघी 1.75कोटी क्षेत्रफळ आपल्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्या एवढे.भाषा डच.डच लोक डच भाषेचे स्वाभिमानी त्या मुळे इथं इंग्लिश फार कमी.पण लिपि मात्र इंग्लीश म्हणजे रोमन लिपि.या देशांत सगळीकडे वाळू आहे माती नाही.समुद्र सपाटीच्याही खाली हा देश आहे15/16 व्या शतकातील अनेक घरे लोकांनी जतन केली आहेत.म्हणजे लोक त्यात राहतात देखील.आणखी या देशाचे वैशिठ्य म्हणजे पाण्याचे कनॉल!आणि या कनॉल्मुळ याच्या सौंदर्यात भर पडली आहे अम्स्तेर्डम मधे 160कनोल आहेत ज्याची स्वच्छता नेहमी केली जाते.ट्राम आणि बस चा मार्ग एकच असतो बाजूला इतर वाहनासाठि वेगळा मार्ग सायकल आणि स्कूटर साठी वेगळा मार्ग आणि पायी चालणार्यासाठी वेगळा मार्ग.म्हणून अतिशय सुरक्षित वाहतुक आहे.म्हातारा माणूस बाहेर गेला तर काळजी वाटत नाही.इथली करनसी यूरो आहे इंग्लड सोडून सर्व युरोप मधे चालते.सद्ध्या युरो आणि रुपया याचा दर 1:75 असा आहे त्यामुळे खरेदी करतांना आपले खूप पैसे गेले असे वाटते.ब्लॉग वर लिहिण्याची सवय नाही त्यामुळे आज थाम्बतो.फोटो कसे टाकता येतील हे पण पाहतो.नमस्कार !have a nice day असे म्हणण्याची पद्धत इथे आहे म्हणून मी पण लिहिले.��

    ReplyDelete
  2. नेदरलँड्सला हवामान नेहमीच लहरी असते काल पासून पाऊस आहे.आपल्याकडे जसा मोठा पाऊस पावसाळ्यात पडतो तसा मोठा नाही पण चिरचिर.इथं स्नोफाल होतो पण रस्ते चालु असतात.हळु हळु टुलिपच्या फुलांचा सिझन सुरु होईल.रस्त्याच्या कडेला टुलिपची फुले यायला लागली की एकदम छान वाटेल.अर्थात तसे इतर वेळी सुद्धा फिरायला मजा येते फक्त पावसात नको वाटते.मी रोज काहीतरी लिहीन असे म्हणालो आहे म्हणून हा प्रयत्न.whats app ग्रुप्वर लिहिले आहे ते ब्लॉग वर पेस्ट कसे करता येईल याचा प्रयत्न चालु आहे पण ते जमेल तेंव्हा जमेल ब्लॉगवर रोज लिहीन.नेदरलँड्स हा देश युरोप मधील देश.लोकसंख्या अवघी 1.75कोटी क्षेत्रफळ आपल्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्या एवढे.भाषा डच.डच लोक डच भाषेचे स्वाभिमानी त्या मुळे इथं इंग्लिश फार कमी.पण लिपि मात्र इंग्लीश म्हणजे रोमन लिपि.या देशांत सगळीकडे वाळू आहे माती नाही.समुद्र सपाटीच्याही खाली हा देश आहे15/16 व्या शतकातील अनेक घरे लोकांनी जतन केली आहेत.म्हणजे लोक त्यात राहतात देखील.आणखी या देशाचे वैशिठ्य म्हणजे पाण्याचे कनॉल!आणि या कनॉल्मुळ याच्या सौंदर्यात भर पडली आहे अम्स्तेर्डम मधे 160कनोल आहेत ज्याची स्वच्छता नेहमी केली जाते.ट्राम आणि बस चा मार्ग एकच असतो बाजूला इतर वाहनासाठि वेगळा मार्ग सायकल आणि स्कूटर साठी वेगळा मार्ग आणि पायी चालणार्यासाठी वेगळा मार्ग.म्हणून अतिशय सुरक्षित वाहतुक आहे.म्हातारा माणूस बाहेर गेला तर काळजी वाटत नाही.इथली करनसी यूरो आहे इंग्लड सोडून सर्व युरोप मधे चालते.सद्ध्या युरो आणि रुपया याचा दर 1:75 असा आहे त्यामुळे खरेदी करतांना आपले खूप पैसे गेले असे वाटते.ब्लॉग वर लिहिण्याची सवय नाही त्यामुळे आज थाम्बतो.फोटो कसे टाकता येतील हे पण पाहतो.नमस्कार !have a nice day असे म्हणण्याची पद्धत इथे आहे म्हणून मी पण लिहिले.��

    ReplyDelete
  3. आज दि 10मार्च 2016 गेला आठवडा हवेत सारखे बदल होत होत होते.कधी प्रचंड थंडी तर कधी पाऊस ,कधी बर्फ आणि त्या मुळे घरात सर्वच आजारी.त्याचवेळी मुलीची प्रसुती.या सर्व गोष्टी अशा होत्या की लिहु शकत नव्हतो.गेल्या आठवड्यापासून दिवस मोठा होतोय.सकाळी 6:45ला उजाड्तय सायंकाळी 7ला सूर्य मावळतो.यात अजुनही बदल होत राहील.मुलीच्या प्रसुती मुळे इथली जीवन पद्धति थोडी का होईना समजली.बारीक सारीक अजार्पणाला डॉक्टर औषध देत नाहीत.होता होईल तेवढे आपोआप बरे होईल असे पाहतात.कुटुम्बाचा डॉक्टर (family docter)आपण निवडायचा आणि त्याच्या कडेच औषध घ्यायचे.त्या डॉक्टरच्या परवानगीशिवाय दुसऱ्या डॉक्टरकडे प्रवेश मिळत नाही.इथं मेडिकल,शिक्षण,मोफत आहेत.व्रूद्धाप्कालीमोफत व्रुद्ढाश्रम असतात.ज्याच्यामधे चांगली सोय असते.अर्थात इथं taxation जबर आहे.बँकेत fd वर int मिळत नाही.त्यामुळे बँकेत पैसे ठेवण्यात लोकांना आवडत नाही.shares मधे गुंतवतात.आजारपण,म्हातार्पण,या गोष्टींची चिंता इथं लोकांना वाटत नाही.साहजिकच लोक चैन करून जगतात.प्रसुती ही नैसर्गिकरीत्या व्हावी असा डॉक्टर सल्ला देतात.शक्यतो घरीच प्रसुती करण्याकडे लोकांचा कल आहे.कारण चांगल्या शिकलेल्या सुइण बाई घरी येऊन प्रसुती करतात.अंगाला मालिश,शेक शेगडी,पथ्य असले लाड नाहीत.पण एखादीची इच्छा असेल तर सुइण बाई दवाखान्यात प्रसुती करून देतात.सुइण बाई दवाखान्यात खोली भाड्याने घेतात लागलीच मदत तर डॉक्टर ची मदत घेतात.सरकारी खर्चाने 6/7दिवस एक सिस्टर रोज सकाळी येऊन 4/5तास थाम्बून हवी ती मदत करते.

    ReplyDelete
  4. आज दि 10मार्च 2016 गेला आठवडा हवेत सारखे बदल होत होत होते.कधी प्रचंड थंडी तर कधी पाऊस ,कधी बर्फ आणि त्या मुळे घरात सर्वच आजारी.त्याचवेळी मुलीची प्रसुती.या सर्व गोष्टी अशा होत्या की लिहु शकत नव्हतो.गेल्या आठवड्यापासून दिवस मोठा होतोय.सकाळी 6:45ला उजाड्तय सायंकाळी 7ला सूर्य मावळतो.यात अजुनही बदल होत राहील.मुलीच्या प्रसुती मुळे इथली जीवन पद्धति थोडी का होईना समजली.बारीक सारीक अजार्पणाला डॉक्टर औषध देत नाहीत.होता होईल तेवढे आपोआप बरे होईल असे पाहतात.कुटुम्बाचा डॉक्टर (family docter)आपण निवडायचा आणि त्याच्या कडेच औषध घ्यायचे.त्या डॉक्टरच्या परवानगीशिवाय दुसऱ्या डॉक्टरकडे प्रवेश मिळत नाही.इथं मेडिकल,शिक्षण,मोफत आहेत.व्रूद्धाप्कालीमोफत व्रुद्ढाश्रम असतात.ज्याच्यामधे चांगली सोय असते.अर्थात इथं taxation जबर आहे.बँकेत fd वर int मिळत नाही.त्यामुळे बँकेत पैसे ठेवण्यात लोकांना आवडत नाही.shares मधे गुंतवतात.आजारपण,म्हातार्पण,या गोष्टींची चिंता इथं लोकांना वाटत नाही.साहजिकच लोक चैन करून जगतात.प्रसुती ही नैसर्गिकरीत्या व्हावी असा डॉक्टर सल्ला देतात.शक्यतो घरीच प्रसुती करण्याकडे लोकांचा कल आहे.कारण चांगल्या शिकलेल्या सुइण बाई घरी येऊन प्रसुती करतात.अंगाला मालिश,शेक शेगडी,पथ्य असले लाड नाहीत.पण एखादीची इच्छा असेल तर सुइण बाई दवाखान्यात प्रसुती करून देतात.सुइण बाई दवाखान्यात खोली भाड्याने घेतात लागलीच मदत तर डॉक्टर ची मदत घेतात.सरकारी खर्चाने 6/7दिवस एक सिस्टर रोज सकाळी येऊन 4/5तास थाम्बून हवी ती मदत करते.

    ReplyDelete
  5. गेले कांही दिवस मी netherlands मधे आहे.माझी आता भारतात परत येण्याची तयारी सुरु आहे.म्हणजे जे बघायचे राहिले आहे ते बघायचे.चार दिवसांपूर्वी आम्ही इसटर हॉलिडे असल्यामुळे ब्रुसेल्स्ला जायचे ठरवले होते पण आता ते शक्य नाही कारण ब्रुसेल्स्ला नुकतेच झालेले बॉम्ब स्फोट.पुन्हा जायचा विचार आहे.पाहू केंव्हा जमते.दि.4मार्च ला माझी मुलगी बाळंतीण झाली.तेंव्हा पासून इथं उसंत मिळत नाही.दोन दिवसांपूर्वी utract नावाच्या गावाला जाऊन आलो.गाव छोटं आहे पण अम्स्तेर्डम्चिच कॉपी.इथं 1810 सालापासूनच्या रेलवे गाड्यान्चे मुझिम आहे.आपल्या जुन्या गोष्टींची जपणुक करण्याची पध्t

    ReplyDelete
  6. गेले कांही दिवस मी netherlands मधे आहे.माझी आता भारतात परत येण्याची तयारी सुरु आहे.म्हणजे जे बघायचे राहिले आहे ते बघायचे.चार दिवसांपूर्वी आम्ही इसटर हॉलिडे असल्यामुळे ब्रुसेल्स्ला जायचे ठरवले होते पण आता ते शक्य नाही कारण ब्रुसेल्स्ला नुकतेच झालेले बॉम्ब स्फोट.पुन्हा जायचा विचार आहे.पाहू केंव्हा जमते.दि.4मार्च ला माझी मुलगी बाळंतीण झाली.तेंव्हा पासून इथं उसंत मिळत नाही.दोन दिवसांपूर्वी utract नावाच्या गावाला जाऊन आलो.गाव छोटं आहे पण अम्स्तेर्डम्चिच कॉपी.इथं 1810 सालापासूनच्या रेलवे गाड्यान्चे मुझिम आहे.आपल्या जुन्या गोष्टींची जपणुक करण्याची पध्t

    ReplyDelete
  7. गेले कांही दिवस मी netherlands मधे आहे.माझी आता भारतात परत येण्याची तयारी सुरु आहे.म्हणजे जे बघायचे राहिले आहे ते बघायचे.चार दिवसांपूर्वी आम्ही इसटर हॉलिडे असल्यामुळे ब्रुसेल्स्ला जायचे ठरवले होते पण आता ते शक्य नाही कारण ब्रुसेल्स्ला नुकतेच झालेले बॉम्ब स्फोट.पुन्हा जायचा विचार आहे.पाहू केंव्हा जमते.दि.4मार्च ला माझी मुलगी बाळंतीण झाली.तेंव्हा पासून इथं उसंत मिळत नाही.दोन दिवसांपूर्वी utract नावाच्या गावाला जाऊन आलो.गाव छोटं आहे पण अम्स्तेर्डम्चिच कॉपी.इथं 1839 सालापासूनच्या रेलवे गाड्यान्चे मुझिम आहे.आपल्या जुन्या गोष्टींची जपणुक करण्याची पद्धत इथे पहायला मिळते.आजच द हॅग नावाच्या गावाला जाऊन आलो (दि 27मार्च )या ठिकाणी आम्स्तेर्डम गावाची प्रतीक्रुती तयार केली आहे.अतिशय उत्तम प्र्तीक्रुती आहे ही प्रतीक्रुती पाहण्यास एक दिवस लागेल.मुलांना देखील पाहताना आनन्द मिळतो.द हॅग गाँव समुद्र काठी आहे.स्वच्छ किनारा,भरपूर हॉटेल्स या मुळे इथं गर्दी खूप.पण सध्या समुद्र स्नान करणे शक्य नाही कारण थन्डिने पाणी अतिशय गार आहे.आज 27मार्च पासून घड्याळ भारतीय वेळेपेक्षा 3:30तास मागे आले कारण दिवस मोठे झाले आहेत.आज सूर्य रात्री 9पर्यंत दिसत होता.अजून कांही दिवसांनी सूर्य रात्री 10पर्यंत दिसेल.

    ReplyDelete
  8. गेले कांही दिवस मी netherlands मधे आहे.माझी आता भारतात परत येण्याची तयारी सुरु आहे.म्हणजे जे बघायचे राहिले आहे ते बघायचे.चार दिवसांपूर्वी आम्ही इसटर हॉलिडे असल्यामुळे ब्रुसेल्स्ला जायचे ठरवले होते पण आता ते शक्य नाही कारण ब्रुसेल्स्ला नुकतेच झालेले बॉम्ब स्फोट.पुन्हा जायचा विचार आहे.पाहू केंव्हा जमते.दि.4मार्च ला माझी मुलगी बाळंतीण झाली.तेंव्हा पासून इथं उसंत मिळत नाही.दोन दिवसांपूर्वी utract नावाच्या गावाला जाऊन आलो.गाव छोटं आहे पण अम्स्तेर्डम्चिच कॉपी.इथं 1839 सालापासूनच्या रेलवे गाड्यान्चे मुझिम आहे.आपल्या जुन्या गोष्टींची जपणुक करण्याची पद्धत इथे पहायला मिळते.आजच द हॅग नावाच्या गावाला जाऊन आलो (दि 27मार्च )या ठिकाणी आम्स्तेर्डम गावाची प्रतीक्रुती तयार केली आहे.अतिशय उत्तम प्र्तीक्रुती आहे ही प्रतीक्रुती पाहण्यास एक दिवस लागेल.मुलांना देखील पाहताना आनन्द मिळतो.द हॅग गाँव समुद्र काठी आहे.स्वच्छ किनारा,भरपूर हॉटेल्स या मुळे इथं गर्दी खूप.पण सध्या समुद्र स्नान करणे शक्य नाही कारण थन्डिने पाणी अतिशय गार आहे.आज 27मार्च पासून घड्याळ भारतीय वेळेपेक्षा 3:30तास मागे आले कारण दिवस मोठे झाले आहेत.आज सूर्य रात्री 9पर्यंत दिसत होता.अजून कांही दिवसांनी सूर्य रात्री 10पर्यंत दिसेल.

    ReplyDelete
  9. Mi bharatat part alo di 15april 2016 ata yapudhe mala je vatel vichar yetil te mi ya blog var lihin .

    ReplyDelete
  10. दि.7 रोजी नाशिक येथे rss जनकल्याण समितीची पश्चिम महाराष्ट्र सम्भागाची बैठक झाली त्यामधे सम्भागातील कामाचा आढावा घेण्यात आला.rss जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह श्री विनायकराव डम्बिर यानी जनकल्याण समितीच्या वतीने महाराष्ट्रात चालू असलेल्या दुष्काळी कामांची माहिती दिली.सोलापूर; सातारा; नगर; पुणे;बीड; जिल्ह्यात चालू असलेली कामे अशी (1)सोलापूर जिल्ह्यात दोन चारा डेपो जनावरांचि संख्या 2050 चालू आहेत.141पाणी साठवन्यासाठी देण्यात आल्या.लिम्बोचिँचोरि;भेन्डिशेगाव;बेलेवाडि या गांवात जलसन्धारनाची कामे चालू आहेत.9 गांवात पाण्याचे ट्यान्कर चालू आहेत.(2)नगर जिल्ह्यात मोहोरदेवडे; भुतेटाकळी; दैत्य नांदूर फक्राबाद; येथे जलसंधारनाचि कामे चालू आहेत.(3)सातारा जिल्ह्यात तलीयेकोरेगाव येथील जलसंधारनाचे काम पूर्ण झाले आहे (4)पुणे जिल्ह्यात 2चारा डेपो सुरू आहेत.27गांवात पाण्याचे ट्यान्कर चालू आहेत.(5)बीड जिल्ह्यात जनावरांना पाण्याचे पानवठे दिले आहेत.धाराशिव येथे st स्टॅण्डवर पाणपोई सुरू आहे.(6)लातूर जिल्ह्यात मांजरा नदीवर 18कि मी लाम्ब 80मी.रुंद आणि 3मी.खोल असे खोलिकरण आणि रुंदीकरणाचे काम चालू आहे 40पोख्लन्ड रोज 22तास काम करत आहेत.हा प्रकल्प 25मे ला पूर्ण होईल.या कामामुळे 180दशलक्ष घनमीटर पाणी साठेल.या कामासाठी श्री रविशंकर यांच्या Art of लिविंग चा मोठा सहभाग आहे.(6)सांगली जिल्ह्यात 1चारा डेपो सुरू झाला आहे.असे एकूण 14चारा डेपो; 18 ठिकाणी जलसंधारनाचि कामे; 206 पाण्याच्या टाक्या दिल्या असून एका गांवात पाणी शुद्धीकरण करून देण्यात येते.या सर्व कामासाठी 14कोटी रुपये खर्च येणार असून त्या साठी आपण सढळ हाताने मदत करावी ही विनंती.आपण देत असलेल्या देणगीला आयकर विभागाच्या 80G कलमाखाली कर सवलत मिळेल.या साठी शरद छत्रे यांचेशि मो नम्बर 9423023808 वर सम्पर्क करावा ही विनंती.

    ReplyDelete
  11. सांगली मिरज रस्त्यावर असलेल्या कॅन्सर हॉस्पिटल मधे रा स्व संघ जनकल्याण समिती मार्फत रो रूग्नाबरोबर असणाऱ्या माणसाला दोन वेळ पुरेल इतके अन्न देतो.या उपक्रमासाठि रु 1000/किंवा 24000/ देणगी द्यावी अशी विनंती आहे माझ्याशी सम्पर्क करा मी शरद छत्रे मो नम्बर 9423023808

    ReplyDelete
  12. माझ्या अजोलची मला खूप आठवण येते.मामाचे गांव सर्व लहान मुलांना आवडतेच.कारण मामा ही अशी व्यक्ति असते की ती लहान मुलांना फार प्रिय असते.पूर्वी मामाचे गांव कुठल्यातरी खेड्यात असायचे आणि त्यामुळे खेड्यातलि गम्मत कांही वेगळी असायची.आता ती गम्मत सध्याच्या खेड्यात नाही; कारण खेड्यान्चे सुध्हा आता शहरीकरण झाले आहे.म्हणून मला असे वाटते की आजकालच्या मुले खेड्यातील वातावरणापासून वंचीत राहिली आहेत.म्हणून मला आमच्या अजोलच्या गमती सगळ्याना शेअर कराव्याश्या वाटतात.
    माझे अजोल कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणारे हलकर्णी.जिथे आज दौलत सहकारी साखर कारखाना आहे.अजौली माझी आजी एक मावशी आणि दोन मामा होते.अजून एका मावशीचे लग्न होऊन ती सासरी होती.घरची गरीबी फार होती.थोडीफार शेती होती त्यातून थोडेसे भात येत असे.गांवात एक खासगी मारूतींचे आणि गणपतीचे मंदिर होते; त्याची पूजा मामाकड़े होती.त्याचे थोडे भात यायचे.हे मंदिर बहुतेक नाडगौडा यांचे असावे.
    उन्हाळ्याची सुट्टी लागली की आमचे वडील आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या मोठ्या भावाला बेळगावच्या गाडीत बसवून द्यायचे.आधी महिनाभर मामाला किती तारखेला मुले निघणार आहेत हे कळवलेले असायचे.आम्ही दोघे भाऊ न घाबरता कोल्हापूरहून बेळगावला जायचे आणि बेळगांवहून चंदगड गाडी पकडून हलकर्णीला जायचे.आजीने अंदाजाने एखादी बैल गाडी हातावर पाठवलेली असायची.हात म्हणजे बसचा थाम्बा हलकर्णीला बसच्या थाम्ब्याला हात म्हणत.बैलगाड़ी नसली आलेली तर आम्ही चालत दोन किलोमीटर घरी जायचो.बैलगाड़ीत गवत घालून मऊ गादी केलेली असायची.रस्ता मालावरचा दगड गोट्यानचा आणि खाच खलग्यान्चा होता.गाडीला धक्के बसायचे.गाडी खड्यातुन उडायची.लहानपणी त्यात मजा वाटायची.घर बऱ्यापैकी मोठे होते पण खूप जुने ;घरात शिरतानां बाजूला दोन मोठया पडव्या होत्या;मागे खूप मोठे परडे विहीर;फुलांची झाडे अम्ब्याची फणसाची झाडे होती.प्रसन्न वातवरण असायचे.कोणतातरी एक पक्षी कुर्र$$कुर्र कूट कूट असा कायम ओरडायाचा.मला त्या पक्श्याचे ओरडणं फार आवाडायचे.
    माझ्या अजौली गरीबी होती.मोठा मामा नोकरीसाठी वण वण हिन्डायचा त्यामुळे तो फार घरात नसायचा.दुसरा मामा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा म्हणजे माझ्या मोठया भावाबरोबरीचा.मामा भाचे बरोबरीचे.पूर्वी असं असायचेच.त्यामुळे आम्ही दोन भाऊ आणि मामा धमाल करायचे.सकाळी उठायची घाई नसायची; पण माझ्या बरोबरीच्या मामाला आजी फार वेळ झोपू द्यायची नाही.

    ReplyDelete
  13. क्रमशः वाचा

    ReplyDelete
  14. बिचारा मामा रडत उठून अंघोळ करून मारुती ; गणपतीची पूजा करायचा.आम्हाला उठायला घाई नसायची; आजी उठल्यावर चहा बरोबर कांही ना काही तरी खायला द्यायची.कधी एखादे कडबोळे चकली किंवा मूठभर चिवडा असायचा.जास्ती मागितले तर मिळायचे नाही.चहाबरौबर खाणे इतकंच असं म्हणायची. एक मावशी घरात लग्नाची होती.ती झाडावर चढण्यात पटाईत होती.फणसाच्य झाडावर एखाद्या खारीगत चढून फणस खाली टाकायची.फणस खायची आमच्यात चढाओढ लागायची ; तेंव्हा फणस सहज पचून जायचा.कापा असूदे नाहीतर बर्का रोज एक फणस खायचाच असा रिवाज़ होता आमचा मुलांचा.एखाद दिवस फणस नसेल तर गावठी आम्ब्याची आढी असायचीच.मग अंघोळ त्यातही कोण जास्त पाणी डोक्यावर ओतून घेतोय याची चढ़ाओढ.वीहीरीतुन रहाटाने पाणी काढण्यात किती मजा आणि थ्रील असायचे.विहिरी शेजारी एक मोठी दगडाची डोण होती.डोण म्हणजे दगडी टब.या डोनिला तळात एक भोक असायचे.त्यात कापडाचा बोला घालून पाणी साठवायचे आणि धुण धूवायचे असा त्या डोनीचा उपयोग व्हायचा.आम्ही मुले डोनिचा उपयोग पाणी साठवून डुम्बण्यआसाठी करायचो.पण वीहीरीतुन पाणी काढून कोण किती बिंदगे डोक्यावर ओतून घेतो यात चढ़ाओढ!गार पाण्याची अंघोळ झाली आणि उन्हाचा ताव असेल तर झोपेची मस्त सुर्सुरी यायची.
    क्रमशः वाचा

    ReplyDelete
  15. आमच्याकड़े म्हणजे अजौली जुना केरम बोर्ड होता त्यामुळे सुट्टिला आलेली सारस्वत ब्राम्हणांची दोनचार पोरं खेळायला येत.केरम खेळण्यात आमच्या बरोबरीचा मामा तयारीचा होता बाकी आम्ही स्ट्रायकर्ने पिसा उडवन्यातच हुशार!पत्ते कूटने हाही एक वेळ जाण्याचा मार्ग असायचा.आमचा मामा आणि एक दोन त्याचे सारस्वत ब्राम्हणांची पोरं यांचे कड़े सायकल असायची ही स्थानिक पोरं पाच की.मी.लांबच्या शाळेला सायकल ने जात.सायकल ही गोष्ट अपुर्वाइची होती.हम्बर; रेली या सायकल कम्पन्या त्यावेळी फार प्रसिद्ध होत्या आणि ही सायकल ज्याच्या कड़े असेल तो पोरगा जरा जास्त भाव मारायचा.गरज ही शोधाची किंवा मार्ग दिसन्याची जननी असते असं म्हणतात ते खरं आहे.कारण गावातल्या सगळ्या पोरांना सायकल्ची दुरुस्ती; पंक्चर काढणे हे सहजपणे येत असे.कारण गांवात सायकल दुरुस्तीचे किंवा पंक्चर काढायचे दुकान न्हवते.त्यामुळे कारण नसतांना सायकलचा एखादा पार्ट काढायचा आणि तो पुन्हा जोडायचा हा फुकटचा उद्योग.आम्हाला शहरी पोरांना ही गावातली पोरं हात लाऊन द्यायची नाहीत.आम्ही मग उकिडव बसून अंगावर बसणार्या माशा हाकलत पोरं सायकलचे काय वाटोल करतात हे पहात बसायच.

    ReplyDelete
  16. क्रमशः वाचा

    ReplyDelete